पुण्यात कै.यशवंतराव पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सुर्योदय वृद्धाश्रम येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
आजी आजोबांना विरुंगळा, सुखाचे क्षण, खाऊ, वस्तू वाटप व संगीत कार्यक्रमाची मेजवानी
कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
पुणे – सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत असणारी पुण्यातील आघाडीची एकमेव संस्था म्हणजे कुसुम वास्तल्य फाउंडेशन. गोरगरिबांसाठी, वृद्धांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची सतत तळमळ, पायाला भिंगरी लावून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठीची धडपड असे अनेक विलक्षण गुण धारण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील यांचं नाव प्रामुख्याने सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळते.
कै. यशवंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित सूर्योदय वृद्धाश्रम येथे नुकताच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पवार, पुणे पोलीस सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी सातपुते,विशेष सहकार्य उद्योजिका चारूलता पुरोहित ह्यांनी केले,,प्रमोद गरुड, आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेतर्फे विजय विठ्ठलराव जगदाळे, सूर्यकांत हरिभाऊ घोणे, सतीश प्रभाकर कालेकर, अशोक बाबुराव नीलकंठ व जगन्नाथ काळू महाजन या सर्वांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या हस्ते राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी इरफान शेख यांनी आपल्या छोटेखानी भाषणात संस्थेचे भरभरून कौतुक केले. संस्थेतर्फे जे जे कार्य केली जातात ती व प्रत्यक्षात पाहत असलेले कार्य मी फक्त वृत्तपत्रात किंवापुस्तकात वाचली होती. पण काल ती मी प्रत्यक्षात पाहिली तसेच जवळून अनुभवली देखील. सर्वोदय वृद्धाश्रम मध्ये असणारे आजी आजोबा यांना पाहून खूप वाईट वाटले परंतु छाया ताई व तुम्ही सर्वांनी त्यांचे आश्रम किती सुंदर ठेवले आहे. त्याकरिता किचन , राहण्याची व्यवस्था, त्यांच्या करिता लागणारे समान किती नीटनेटके ठेवले आहे. मला आजी आजोबा करिता असणारी लायब्ररी व त्याची व्यवस्था पाहून मी भारावून गेलो आहे. माझ तर विचार होता की, कार्यक्रम करून एक-दीड तासात परतावे परंतु तुम्ही व तुमच्या सदस्यांमध्ये असलेले प्रेम, आपलेपणा, आजी आजोबाची काळजी, आपुलकी तसेच तुमचे कार्य पाहून मला स्वतःहून खूप छान वाटले व जास्तीत जास्त वेळ घालवावा असे माझ्या मनाला वाटल्याने मी माझे इतर कार्यक्रम रद्द करून मला शक्य झाले तेवढा वेळ दिला. हे मी माझे भाग्य समजतो. मला तुमच्या कार्यात सहभागी केल्याबद्दल तुमचे व तुमच्या फाउंडेशन संस्थेचे खूप खूप आभार व तुमचा मी ऋणी आहे मला पुन्हा अशा कार्यात बोलवाल अशी आशा बाळगतो असे कौतुक करून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे निवेदन गायन रामेश्वर शिंदे यांनी केले तर आभार छाया भगत, अजय महाजन, यांनी मानले कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष, सचिव, संचालक, कार्याध्यक्ष व सर्व संस्था समिती यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
आश्रमात कार्यक्रम घेण्याचे एकच उद्धिस्ट होते की, आपल्या ओळखीच्या लोकांना आश्रम कळावा, आश्रमातील वृद्ध लोकांचे जीवन कळावे, त्यांच्या समस्या समजून घेता येतील तसेच त्यांना सर्वांची मदत मिळेल या उद्दात हेतूने कार्यक्रमासाठी आश्रमाची निवड करण्यात आल्याचे कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी सांगितले.