मालाडमधील ३६.४० लाखांची घरफोडी उघडकीस; सराईत आरोपी अटकेत, मालाड पोलिसांची कामगिरी

Spread the love

मालाडमधील ३६.४० लाखांची घरफोडी उघडकीस; सराईत आरोपी अटकेत, मालाड पोलिसांची कामगिरी

मुंबई – मालाड पश्चिम येथील एका इमारतीमध्ये रात्रीच्या सुमारास चौथ्या मजल्यावर पाईपच्या सहाय्याने चढून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मालाड पोलिसांनी केवळ १२ तासांत अटक केली. चोरी केलेले सोनं व हिऱ्यांचे दागिने, एकूण किंमत ३६.४० लाख रुपये, जप्त करण्यात आले आहेत. १० एप्रिल २०२५ रोजी रात्री एका व्यावसायिकाच्या बंद घरात आरोपीने खिडकीतून प्रवेश करून कपाट फोडले व मौल्यवान दागिने चोरून नेले. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्यानंतर तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. अस्पष्ट फुटेज एआय टूल्सच्या मदतीने स्पष्ट करून आरोपीची ओळख पटवण्यात आली. तो म्हणजे संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (वय २३), एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३० गुन्हे नोंद आहेत. खबऱ्यांची मदत व तब्बल १०० सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीचा माग काढला. अखेर जोगेश्वरी रेल्वे पटरीनजीक झोपडपट्टीत त्याला ताब्यात घेण्यात आले. मालाड पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात मालाड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करून चोरी गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) श्री. अभिषेक त्रिमुखे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ११) श्री. आनंद भोईटे, मा. सहायक पोलीस आयुक्त (गोरेगाव विभाग) श्री. हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजयकुमार पन्हाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात मालाड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि रायवाडे, पो.उ.नि. तुषार सुखदेवे, दहशतवाद विरोधी पथकाचे पो.उ.नि. गौस सय्यद, कांदिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि गीते व पो.उ.नि. साटम यांचा समावेश होता. या कामगिरीत मालाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.ह. संतोष सातवसे, जयदीप जुवाटकर, अमित गावड, अविनाश जाधव, पो.शि. मंदार गोंजारी, सचिन गायकवाड, वलीत पाईकराव, वैभव थोरात आणि कांदिवली पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.ह. गांवकर, तिजरे व पो.शि. आदित्य राणे (परिमंडळ ११ – तांत्रिक मदत) यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon