व्हॉट्सॲप इमेज डाउनलोड होताच अकाउंट रिकामे होईल, सायबर गुन्हेगाराची फसवणुकीची ही आहे नवीन पद्धत
पोलीस महानगर नेटवर्क
डिजिटल युगात, तंत्रज्ञानामुळे आपले जीवन खूप सोपे झालं आहे. माहिती देवाण घेवाण असेल की अजून आर्थिक व्यवहार असेल तंत्रज्ञानामुळे हे सगळं सोपं झालं आहे. मात्र याच डिडिटल तंत्रज्ञानाचा जर तुम्ही काळजीपूर्वक वापर नाही केला तर तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.आता फक्त बनावट कॉल किंवा ईमेलच नाही तर एक साधा फोटो देखील तुमचा मोबाईल आणि बँक खाते हॅक करू शकतो. हल्ली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नव- नवीन मार्गांचा वापर करत आहेत. अशीच एक घटना मध्यप्रदेशमधील जबलपूरमधून समोर आली आहे. या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर एक फोटो आला. पीडितेने त्या फोटोवर क्लिक करताच त्याचा मोबाईल हॅक झाला आणि काही मिनिटांतच त्याच्या बँक खात्यातून २ लाख रुपये गायब झाले.
या सायबर फसवणुकीला ‘व्हॉट्सॲप इमेज स्कॅम’ किंवा ‘मॅलिशियस लिंक स्कॅम’ असे म्हणतात, जे खूप धोकादायक आहे. एका चुकीच्या क्लिकमुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक खाते रिकामे होऊ शकते. फसवणूक करणारे ठग सर्वप्रथम व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग ॲपद्वारे फोटो पाठवतात. मग ते फोन करतात आणि विचारतात की, तुम्ही या फोटोतील व्यक्तीला ओळखता का? त्या व्यक्तीने फोटो डाउनलोड करताच त्याचा फोन क्रॅश होतो. यानंतर सायबर गुन्हेगारांना फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवतो. सायबर तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, आता लोक ओटीपी किंवा बनावट लिंक्सबद्दल सावध झाले आहेत, म्हणूनच फसवणूक करणारे “स्टेगॅनोग्राफी” नावाचे तंत्र वापरत आहेत, ज्यामध्ये फोटोमध्येच एक धोकादायक लिंक लपलेली असते. त्यामुळे अशी लिंक किंवा फोटोवर क्लिक करण्याआधी विचार करा आणि अशा फसवणूकीपासून सावध व्हा, असा तज्ञांनी दिला आहे.
अशी घ्या काळजी
– अनोळखी नंबरवरून आलेला कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ फाइल डाउनलोड करू नका.
– जर कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओचा आकार सामान्यपेक्षा मोठा वाटत असेल तर तो डाउनलोड करणे टाळा.
– आपण वापरत असलेला व्हॉट्सॲप नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करु नका.
– जर तुमच्यासोबत अशी घटना घडली तर ताबडतोब सायबर क्राइम पोर्टलला कळवा किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.