ठाण्यात लोढा बिल्डरकडून फसवणूक, मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक, नागरिकांना न्याय देण्यासाठी आंदोलन

Spread the love

ठाण्यात लोढा बिल्डरकडून फसवणूक, मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक, नागरिकांना न्याय देण्यासाठी आंदोलन

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – लोढा हे बांधकाम व्यवसायाच्या जगतातील एक प्रख्यात नाव. पण त्याच लोढा बिल्डरविरोधात आता ठाण्यात असंतोष पसरला आहे. ठाणे शहरातील कोलशेत भागात लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी पैसे गुंतवले होते. परंतू, यातील काही ग्राहकांचे बँकेचे कर्ज मंजूर झाले नसल्यामुळे त्यांनी घरांची नोंदणी रद्द करुन सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली. परंतू, या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांचे पैसे परत करण्यास विरोध केला. त्यामुळे लोढा या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी (गुरुवारी) आंदोलन केलं. यावेळी मनसेने व्यावसायिकाच्या विरोधात विविध आशयाचे फलक हातात घेतले होते. यावेळी फसवणूक झालेले ग्राहकांसमोर त्यांनी लोढाच्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी जाब देखील विचारला.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाने घरे बुक केली होती, त्यांनी लाखो रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले, पण कर्ज मंजूर न झाल्यामुळे घराची बुकिंग रद्द करण्याची विनंती मनसे तर्फे बिल्डरला करण्यात आली, बिल्डर याने लोकांनी भरलेले लाखो रुपये परत करण्यास विरोध केला, त्यानंतर आज लोढा बिल्डरच्या विरोधात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले की, लोढा बिल्डर हजार मराठी तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक आकर्षित ऑफर तयार करतात आणि गरिबांसाठी स्वस्तात घर आणि अशाप्रकारे वेगवेगळी कार्यालये काढतात. गणेश भोईर नावाचा एक रिक्षा चालक आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी फ्लॅट बुक केला आणि तीन लाख रुपये आगाऊ रक्कम दिली त्यानंतर त्यांनी कर्जासाठी प्रोसेस केल्यानंतर त्याचं कर्ज मंजूर झाले नाही आणि तो बुकिंग रद्द करायला आला तर त्यांनी सांगितलं की, तुमचे जे काही पैसे आहे ते तुम्ही कट करा आणि बाकीचे काही पैसे परत करा. मागील दोन वर्षांपासून त्याला बिल्डर पैसे देत नाही. काल त्याला सांगितलं की तुला पैसे मिळणार नाही जे करायचे ते कर. आणखी एक केतकी नावाची मुलगी आहे, त्याचा देखील हॉटेलचा व्यवसाय होता आणि आई -वडील नसलेली ती मुलगी आहे. तिने देखील पंधरा लाख रुपये भरले आणि तिला दहा लाख रुपये परत देण्यात आले. आम्हीसोबत असल्यामुळे त्याचे पाच लाख रुपये कट करण्यात आले. नाईक आणि पंडित नावाच्या महिला आहेत, त्यांनी देखील दोन कोटी आठ लाखाचं घर घेतलं. त्याला ६५ लाखाचा रुपये दंड आकारला गेला आहे. अशा हजारो केस बिल्डरच्या विरोधात आहेत. बिल्डर पैसे परत करत नाही. लोढा हे मंत्री असल्यामुळे नागरिकांची दखल घेतली जात नाही. रिक्षा चालक गणेश त्याचे पैसे परत मिळावे यासाठी एका वर्षापासून पाठपुरावा करत आहे. त्यांना अजून कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग दिलेला आहे. त्या मार्गाचा वापर करून आम्ही आंदोलन करत आहोत.

आम्ही लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढू

जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. ६५ लाख रुपये दंडाची रक्कम महिला कशा भरतील? रेराचां कायदा आहे की बुकिंग रद्द केल्यावर पूर्ण पैसे मिळतील. बिल्डर पैसे परत करत नाही. हा एका बिल्डरचा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मधील बिल्डराचा हाच विषय आहे. नाव मोठे दर्शन खोटे. आमच्या गणेशने तीन लाख रुपये दिले आहेत आणि तो सकाळी आठ वाजता रिक्षा काढून सायंकाळी सात पर्यंत रिक्षा चालवतो, तेव्हा त्याला एक हजार रुपये मिळतात आणि आता भागिले तीन लाख रुपये करा आणि त्याचे तीनशे दिवसची महिन्याचे पैसे आम्ही खाऊन देणार नाही. त्या रिक्षा चालकाला तीनशे दिवस लागेल तीन लाख रुपये कमवायला. आम्ही लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढणार म्हणजे काढणार, असं म्हणत अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon