संगमनेर हादरलं ! डॉक्टरने तपासण्याच्या बहाण्याने १६ वर्षांच्या मुलीला गच्चीवर नेत केलं दुष्कर्म
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – संगमनेर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन युवतीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करत तिला टेरेसवर नेले व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला. अत्याचार करून डॉक्टर फरार झाला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली जात आहे. मुलीने झाल्या प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळ्यांनी रुग्णालय गाठलं. पोलिसांना खबर देण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर फरार डॉक्टरला रविवारी रात्री संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतलं आहे. अमोल करपे असे डॉक्टरचे नाव आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भयानक घटना घडली आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने अत्याचार केल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर फरार झालेल्या डॉक्टरला रविवारी रात्री संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतल आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आलीय .अमोल करपे असे डॉक्टरचे नाव आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला त्रास होऊ लागल्याने तिला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करून तिला टेरेसवर नेले व अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. कुटुंबीयांना माहिती समजतात कुटुंबीयांनी इस्पितळात धाव घेतली. यावेळी पोलिसांनीही घटनास्थळी जात परिस्थिती हाताळत डॉक्टर अमोल कर्पे याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार असल्याने पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून नाशिक येथून रात्री डॉक्टरला ताब्यात घेतल आहे. घटनेची माहिती समजल्यावर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी देखील पोलिस ठाण्यात जात आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.