तनिषा भिसे प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचा अहवाल खोटा; आमदार अमित गोरखेंचा आरोप, मुख्यमत्र्यांना भेटणार
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंबंधी रुग्णालयाने अहवाल जाहीर केला आहे. तो अहवाल खोटा असल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखेंनी केला आहे. यासंबंधी शनिवारी ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत असेही सांगितले आहे. तनिषाचे पती आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. आमदार गोरखे म्हणाले की, एकतर सुरूवातीपासूनच या घटनेचा साक्षीदार आहे. रुग्णालयाने १० लाख नाही तर २० लाख रुपये मागितले होते. १० लाख रुपये भरा असे सांगितले होते. आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली बाजू सुरक्षित करण्यासाठी जे निवदेन दिले आहे ते अत्यंत चूकीचे आहे. त्यांच्या पत्नीने जग सोडले. याचे कारण रुग्णालयच आहे. डॉ. घैसास आणि सुशांत भिसेंचे सीडीआर नक्की तपासावेत. डॉ. केळकर आणि सुशांत भिसेंच बोलणे झाले आहे तेही तपासाव. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून जे बोलणे झाले ते तपासावे.सीसीटीव्ही फुटेज तपासावे. हे जर सर्व पाहिले तर नक्की लक्षात येईल कोण चुकले आहे. आणि आता रुग्णालय आपली बाजू खरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी ते शनिवारी मुख्यंमंत्र्यांना भेटणार आहेत असे सांगितले आहे.
अहवालात कर्करोग झाल्याचे नमूद केले आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, हे धादांत खोटे आहे. अहवाल वाचल्यानंतर मी सुशांतशी बोललो माझ्यासोबत डॉक्टरही आहेत. तनिषाची दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. गाठ काढण्याची शस्रक्रिया झाली होती. कर्करोग असता तर ती गरोदर राहिली असती का? कर्करोगात आठ महिने कोणी काढू शकत का? याचा विचार केला पाहिजे. गरोदरपणासाठी आयव्हीएफ उपचार त्यांनी घेतला. आठव्या महिन्यात प्रसूती करावी लागेल आणि ती चांगल्या रुग्णालयात करावी. म्हणून ते दीनानाथ रुग्णालयात आले. जिथे आधी उपचार घेतला होता आणि डॉक्टरांना याबद्दल माहिती होती. दरम्यान सरकारकडूनही तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवालानुसार कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.