एसटी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटलं, ७० प्रवाशी असणारी बस रस्त्याच्या बाजूच्या खड्यात पलटी, ३५ जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
शहापूर – मुरबाड एसटी स्टँडवरून शहापूरला जाणाऱ्या बसचा कुडवली गावाजवळील एका वळणावर भीषण अपघात झालाय. एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ७० प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमधील प्रवाशांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापती झाल्या असून अनेकांना मुका मार लागला आहे .धावत्या बसचे पाठ हे अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघात झाल्याचे कळताच मुरबाड पोलीस व स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. ७० प्रवाशांना अपघातग्रस्त बस मधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.एसटी बसच्या दुरावस्थेकडे या अपघाताने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. स्क्रॅपमधील गाड्या वापरल्या जातात का ? त्या वापरल्या जात असतील तर एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाची हेळसांड होतीय का असा सवाल प्रवासी विचारत आहेत.