तीन अल्पवयीन मुलींच्या व्हिडीओ व्हायरलं करणाऱ्या नराधम गुन्हेगार तन्नाला अटक
रवि निषाद / मुंबई
मुंबई – गोवंडी शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रफीक नगरमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा वीडियो वायरल झाल्यावर पोलिसांनी तन्ना नावाचा आरोपीला तात्काळ अटक केलाची माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी तन्नावर यापूर्वी अनेक गुन्हे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रफीक नगरमध्ये परिसरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील या अल्पवयीन मुली आहेत. त्यातील एक इयत्ता दहावी, दुसरी नववीत तर तिसरी मुलगी सातवीमध्ये शिक्षण घेत आहेत. मुलींचे आई वडील मजदूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. या मुलींना तन्ना आणि त्याचा साथीदार नाहक त्रास देत होते. त्याना जीवे मारण्याची धमकी देत होते. त्या मुलींचा एक वीडियो बनवून आपली तक्रार येथील पोलिसांना केली.स्थानिक आमदार अब्बु हासिम आजमीला सदर तो वीडियो पाठवला होता.आमदार आजमीनी पीड़ित परिवाराला भेंट देऊन तात्काळ कार्यवाईची मागणी केली. याबाबत सांगण्यात येत की, अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटिल आणि परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या देखरेखाखाली पोलिसांनी तन्ना आणि त्याचे इतर साथीदारावर गुन्हा नोंद करुन तन्नाला अटक केली आहे. तर इतर फरार असलेल्या काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.