गोरेगाव च्या बांगूर नगरमध्ये ४० वर्षीय व्यक्तीचा घराकाम करणार्या महिलेवर बलात्कार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई मध्ये घरकाम करणार्या बाईवर बलात्कार करून आरोपी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बांगूर नगर भागातील आहे. ३५ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार पोलिस स्टेशन मध्ये केली आहे. मागील १५ दिवसांमध्ये या महिलेवर ४० वर्षीय व्यक्तीने दोनदा बलात्कार केल्याचा दावा आहे. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास शारिरीक त्रास दिला जाईल अशी धमकी देखील दिली होती. दरम्यान घरातील मंडळी बाहेर गेल्याने एकटाच असलेल्या या आरोपीने संधीचा फायदा घेतला. सध्या आरोपी विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी बलात्कारानंतर पीडीत घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती. तिने कुठेही याबद्दल बोलणं टाळलं. तिच्या गप्प बसण्याचा फायदा घेत दुसर्या दिवशीही त्याने अत्याचार केला. तिसर्या दिवशी तिने कामावर जाणं टाळलं. अचानक काम का सोडलं? असा प्रश्न पीडीतेला घरच्यांनी विचारला त्यानंतर तिनं घडला प्रकार सांगितला. पीडीतेच्या कुटुंबाने नंतर तातडीने बांगूर नगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.