अँटॉप हिल पोलिसांची मटका जुगारावर कारवाई; ६ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई – मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी मटका जुगारावर धाड टाकत ६ आरोपींवर कारवाई केली. ही कारवाई ८ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री १२:२१ वाजताच्या सुमारास करण्यात आली. सदर कारवाई राजीव गांधी नगर, बंगालीपुरा, चर्चच्या मागे, अँटॉप हिल, मुंबई येथे करण्यात आली. तक्रारदार पोलीस शिपाई रामेश्वर आंधळे यांनी आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद: गु.र.क्र.-९३/२५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत दाखल केला आहे. या आरोपींमध्ये शमसाद समीम खान (३४), रायटर, महेश अवधेश कुमार द्विवेदी (२७) रायटर, शहाबाद सिकंदर मंडल (२५) खेळी, शाबाद हमीद खान (३३) खेळी, मज्जित अब्दुल मुली (२७) व रिजावत जिन्नात मुल्ला (२८) यांचा समावेश आहे. सदर आरोपींना बी.एन.एन.एस. कलम ३५(३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी जुगारातून एकूण २३,४८०/- रुपये जप्त केले.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी आरोपी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. तपास अधिकारी: स.पो.नि. शिवाजी मदने, स.पो.नि. सतिश कांबळे, पोलीस हवालदार आंधळे, टेळे, पोलीस शिपाई विसपुते, आमदे, किरतकर, सजगणे यांनी सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.