कलंक ! पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, नराधम बापानेच केला पोटच्या लेकीवर आठ महिने लैंगिक अत्याचार
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – स्वारगेटमधील अत्याचाराची घटना अजूनही लोक विसरलेले नाहीत. राज्यभरात या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. अशातच, पुणे शहरातच आणखी एका घटनेने शहर हादरलं आहे. पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे.
स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर नराधम बाप ८ महिने लैंगिक अत्याचार करत होता. आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर ४५ वर्षीय नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे.