इमॅजिकामध्ये शाळेच्या सहलीदरम्यान १४ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर, शाळाही शोकाकूल

Spread the love

इमॅजिकामध्ये शाळेच्या सहलीदरम्यान १४ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर, शाळाही शोकाकूल

योगेश पांडे / वार्ताहर 

रायगड– रायगडमध्ये पनवेल परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता खालापूर परिसरातून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. नवी मुंबई परिसरात शाळेतील सहली बरोबर आलेल्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईमधील घणसोली महानगरपालिका शाळा क्रमांक ७६ मधील शाळेची सहल गुरुवारी रायगड येथील खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्कमध्ये आली होती. मात्र, या सहलीमध्ये आलेल्या इयत्ता आठव्या वर्गात शिकणाऱ्या कुमार आयुष धर्मेंद्र सिंग या १४ वर्षाच्या मुलाचा हृदय विकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्याचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. आयुष सिंग याच्या छातीमध्ये दुखायला लागले यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलं. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुष याला तपासून मृत घोषित केले. खालापूर पोलीस ठाण्यात या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अलोक खिस्मतराव करीत आहेत. हसत खेळत आनंदात राहणाऱ्या सिंग कुटुंबातील हे लेकरू सहलीला गेलं ते परतलेच नाही त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

लहानग्या वयात आयुष याच्या अशा या जाण्याने शाळेत व परिसरावर शोककाळा पसरली आहे. नवी मुंबई परिसरातील या शाळेवर व सिंग परिवारावरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अलीकडे लहान वयातच हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याचा प्रकार वाढले आहेत. आयुष याला इतक्या कमी वयात हृदयविकाराचा तीव्र झटका नेमका कशामुळे आला आहे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या सगळ्या घटनेचा तपास खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पण, इतक्या लहान वयात हार्ट अटॅक येणे हे पालकांसाठी चिंतेचं कारण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon