माटुंगा पोलिसांची मोठी कारवाई: चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, चार गुन्ह्यांचा छडा
मुंबई – माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारसी कॉलनी येथे महानगरपालिकेच्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट्स चोरीस गेली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे महेश सुरेंद्र प्रसाद गुप्ता (वय २१, रा. खडवली, कल्याण) यास अटक केली. अटकेनंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, एकूण चार गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीकडून ६३,५४७ रुपये किमतीचे चार मोबाईल फोन आणि ६९,००० रुपये किमतीच्या २३ लोखंडी बॅरिकेट्स हस्तगत केल्या. सध्या आरोपी २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत आहे.
सदर यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त श्री. अनिल पारसकर, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०४ श्रीमती आर. राग सुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग श्री. योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उ.नि. सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा पोलीस ठाण्याच्या पथकाने पूर्ण केली आहे. या कामगिरीत पोलीस शिपाई जुवाटकर, देशमाने, मेटकर, तोडासे, बहादुरे आणि सोनवलकर यांनी मोलाची भूमिका बजावली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.उ.नि. सुनिल पाटील करत आहेत.