कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा; तर २ तासात जामीन मंजूर, ३० दिवसात अपिलात जाण्याची मुभा

Spread the love

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा; तर २ तासात जामीन मंजूर, ३० दिवसात अपिलात जाण्याची मुभा

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

कोकाटे यांचं प्रकरण काय ?

कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या. त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण १९९७ पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. मात्र, आता माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon