कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाची तोडफोड; सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण परिसरात सध्या गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढले आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना भाजपच्याच पदाधिकाऱ्याचे कार्यालय व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनामुळे कल्याणमधील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. “माझा जीव आणि जागा दोन्हीही धोक्यात आहेत. बिल्डर मला त्रास देत आहे. मला वाचवा …” असं कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
कृष्णा उर्फ सोनू कारभारी यांच्या भाजप कार्यालयाचा सीसीटीव्ही फोडून कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न झाला. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुुरु केला आहे. कृष्णा उर्फ साेनू कारभारी यांची कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली समोर २७ गुंठे जागा आहे. ही जागा त्यांच्या मालकीची आहे. याच जागेत कृष्णा यांचे भाजपचे जनसंपर्क कार्यालय आहे. कृष्णा हे भाजपच्या वाहतूक शाखेचे कल्याण शहर अध्यक्ष आहे. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास काही लोक येऊन त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. त्याठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील त्यांनी तोडून फेकून दिले. कृष्णा यांच्या जागेत जबदरस्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन शैलैश जैन आणि रितेश किमतानी यांच्यासह अन्य २५ पेक्षा जास्त जणांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याने त्यांच्यावर खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.