नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी केले २० – २५ तोळे सोने लंपास

Spread the love

नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी केले २० – २५ तोळे सोने लंपास

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता सिडको परिसरात एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी सोन्याच्या दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. दोन बंदूकधारी दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला. यानंतर कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरी केली.

यानंतर दोघेही दरोडेखोर दुचाकीवर पसार झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून नाशिक पोलिसांकडून चोरट्यांचा शोह घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. भर दिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा पडल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon