अँटॉप हिल पोलिसांनी ५५६ ग्रॅम गांजासह तरुणास घेतले ताब्यात
मुंबई – अँटॉप हिल पोलिसांनी गस्तीदरम्यान एका तरुणाला ५५६ ग्रॅम गांजासह अटक केली. आरोपीचे नाव सैफान मोहम्मद साज्जीद मन्सूरी (वय २१, व्यवसाय – मजुरी, राहणार – न्यू ट्रांझिट कॅम्प, राजीव गांधी नगर, बंगाली पुरा, मुंबई-३७) असे आहे. दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालीत असताना, रूम नंबर ५१८ च्या समोर, न्यू ट्रांझिट कॅम्प, राजीव गांधी नगर, बंगाली पुरा येथे हा आरोपी बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ बाळगून असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता ५५६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे बाजारभाव किंमत १३,३४४ रुपये आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.र.क्र. ५८/२०२५, कलम ८ (क) सह २०(ब), एनडीपीएस कायद्यानुसार १९८५ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरी, मारहाण आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाईत स.पो.नि. शिवाजी मदने, पो.नि. किशोरकुमार राजपूत, स.पो.नि. सतीश कांबळे, पो.ह. घुगे, पो.ह. आंधळे आणि पो.शि. सजगणे यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे, अँटॉप हिल पोलीस ठाणे, मुंबई