पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्या; दोन आरोपींना जन्मठेप
मुंबई – पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्या; दोन आरोपींना जन्मठेप पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १६ जून २०२१ रोजी आरोपी चेतन बाळू तिकोने (वय ३०, मुंबई) यांची पत्नी डेलजीन तिकोने हिचे फिर्यादीचा भाऊ विकास सुभाष पासी (वय २०) याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी अक्षय दत्ताराम गायकवाड (वय २२) याच्या मदतीने त्याची हत्या केली. गायकवाड याने लोखंडी पाइपने विकासच्या डोक्यावर वार केला, तर चेतन तिकोनेंनी धारदार शस्त्राने छाती, पोट आणि हातावर वार करत त्याला ठार मारले. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी सी.ए. रिपोर्ट व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता श्रीमती रंजना बुधवंत यांनी एकूण १६ साक्षीदार तपासले, त्यानंतर सत्र न्यायाधीश एन. पी. त्रिभुवन यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्म दंड न भरल्यास चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान निवृत्त पोलीस निरीक्षक प्रविण कुस्कर, सरकारी अभियोक्ता, तसेच न्यायालयीन स्टाफ आणि पैरवी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.