१७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, नराधमांनी व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर केला व्हायरल

Spread the love

१७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, नराधमांनी व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर केला व्हायरल

योगेश पांडे/वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी येथे २२ वर्षीय तरुणाने आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहरुख (नाव बदलले आहे) असे आरोपीचे नाव असून त्याने गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि हे संपूर्ण कृत्य मोबिल फोन मध्ये रेकॉर्ड केले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही त्याने अल्पवयीन मुलीसह इतर दोघांसोबत या संपूर्ण कृत्याचे व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर केले आणि त्यानंतर अल्पवयीन पिडीतेला ब्लॅकमेल केले आणि फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अत्याचारानंतर शाहरुखने ज्यांना व्हिडीओ शेयर केला त्यात एक २५ वर्षीय तरुण आणि आणखी एक १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे.दरम्यान, तरुणीने संपूर्ण घटना घरी सांगितल्यावर घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठले, तक्रारीनंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, तिन्ही आरोपींविरोधात पोकॉस आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतील पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत शाहरुखने लैंगिक अत्याचारकरून त्याच्या फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हंटले आहे. पीडितेने सांगितले की, दोन साथीदारांनी तिची प्रतिष्ठा खराब करण्याच्या हेतूने व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. शाहरुखने हा व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुपमध्ये पोस्ट केल्याने व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला होता. त्रास सहन न झाल्यामुळे पिडीतेने घरी आई वडिलांना संपूर्ण घडलेली घटना सांगितली, घरच्यांनी विलंब न करता ८ फेब्रुवारी रोजी भिवंडी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी तिला पाठिंबा दिला. तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी तातडीने कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ काढून टाकला जाईल याची खात्री करून घेत आहेत आणि या त्रासदायक काळात पीडितेला आधार देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon