देवनार पोलीसानी ४४ किलो गांजासह एकाला केली अटक
रवि निषाद/मुंबई
मुंबई – गोवंडी मधील देवनार पोलिसांच्या हद्दीत एका बंद घरात छापा टाकून पोलिसानी ४४.२७४ किलोग्राम गांजा हस्तगत केला आहे. घर मालकावर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला अटक केल्याची माहिती मिळाली आहे.अटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव मोहम्मद महमूद आलम शेख सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०१/०२/२०२५ रोजी देवनार पोलिसांच्या डिटेक्शन स्टाफ रात्री गस्त करत असताना पोलिसाना माहिती मिळाली की, मोहम्मद महमूद आलम शेख याच्या घरात गांजाचा साठा आहे. त्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा घरात छापा टाकून तिथून ४४.२७४ किलोग्राम गांजा हस्तगत केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सैयद तसेच येथील डैशिंग पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी विशेष स्थानिक गु.र.क्र – २६/२०२५ कलम ८ (क) सह २० (ब), ii (क) एनडीपीएस एक्ट या कलमानुसार गुन्हा नोंद करुन आरोपी मोहम्मद महमूद आलम शेख २७ वर्ष याला अटक केली आहे. अंजुमन हायस्कूल जवळ, न्यू गौतम नगर,प्लॉट नंबर ०१, गोवंडी, मुंबई ४३, या ठिकाणी तो राहत होता. या प्रकरणात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोकाटे, पोलिस निरीक्षक दिवे, पोलिस हवलदार बाड, पोलिस शिपाही कुंभार, कोकाटे आणि त्यांची टीम अधिक तपास करत आहे.