घाटकोपर येथील कैलाश प्लाझा ला लागली आग
रवि निषाद/मुंबई
मुंबई – घाटकोपर पूर्व परिसरात असलेल्या कैलास प्लाझामध्ये शुकवारी सकाळी ६.३० वाजता आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची माहिती समोर आहे.
मिळाली माहितीनुसार, घाटकोपर पूर्वमध्ये असलेल्या कैलास प्लाझा शॉपिंग सेंटरमध्ये दिनांक ३१/०१/२०२५ रोजी सकाळी ०६:२२ वाजता आग लागल्याची माहिती पंतनगर मोबाइल १ च्या एमडीटीवर कॉल प्राप्त झाला होता. कैलास प्लाझा बिल्डिंग आर एन नारकर मार्ग, ओडियन मॉल च्या समोर पंतनगर घाटकोपर पूर्वमध्ये आग लागली असल्याची महिती प्राप्त झाली असता पंतनगर मोबाइल वन तात्काळ नाकाबंदी पॉइंटवरून कॉल साठी रवाना होऊन घटनास्थळी पोहचली असता कैलास प्लाझा २ रा माळा २२७,तिसरा माळा ३३८, चौथा माळा ४३९,नंबर गाळ्यांना आग लागली. घटनास्थळी मानखुर्द, विक्रोळी,चेंबूर,एन वॉर्ड च्या फायर ब्रिगेड च्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. सदरची बिल्डिंग कमर्शियल असून सदर घटनेमध्ये ऑफिस चे नुकसान झाले असून त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.