पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने एका तृतीय पंथीयाने पोलीस ठाण्यातच उतरवले कपडे 

Spread the love

पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने एका तृतीय पंथीयाने पोलीस ठाण्यातच उतरवले कपडे 

योगेश पांडे/वार्ताहर 

नाशिक – पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने एका तृतीय पंथीयावर पोलीस स्टेशनमध्ये कपडे काढण्याची वेळ आली. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. गाडीच्या जाळपोळीतून हे सर्व घडलं. सदर तृतीय पंथीय पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ करताना दिसला. एका अज्ञात व्यक्तीने तृतीय पंथीयाची गाडी जाळली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, तरीही पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने तृतीय पंथीयावर पोलीस स्टेशनमध्ये कपडे काढण्याची वेळ आली. तृतीयपंथीयाने कपडे काढून गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. नाशिकचा म्हसरूळ आरटीओ परिसरात गाडीची जाळपोळ करण्यात आली. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी गाडी जाळली असा तृतीय पंथीयाचा दावा आहे. गाडी जाळल्यामुळे माझं लाखो रुपयांच नुकसान झालं, असं हा तृतीय पंथीय बोलत होता.

राजू शर्मा यांच्याकडे मारुती सुझुकी इग्नीस आणि एक दुचाकी आहे. त्यांनी ही दोन्ही वाहनं विकत घेतली आहेत. ३१ जानेवारी २०२५ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची दोन्ही वाहनं रात्री ९ च्या सुमारास घरासमोर उभी केली. मध्यरात्री तीनच्या सुमारास ते लघुशंका करण्यासाठी म्हणून उठले. त्यावेळी त्यांनी घराच्या खिडकीतून कार आणि दुचाकी जळताना दिसली. ते लगेच घराबाहेर आले. आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे शेजारी तिथे आले. दोन्ही वाहनांना आग लागल्याच दिसत होतं. लोकांनी लगेच मदत केली. पाणी टाकून कशीबशी आग विझवली. पण यात दोन्ही वाहन जळाल्यामुळे लाखो रुपयांच नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon