२०० फूट दरीत कोसळून खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात; बसचे २ तुकडे, ७ जणांचा मृत्यु तर १५ गंभीर जखमी

Spread the love

२०० फूट दरीत कोसळून खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात; बसचे २ तुकडे, ७ जणांचा मृत्यु तर १५ गंभीर जखमी

योगेश पांडे/वार्ताहर 

नाशिक – एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली. नाशिक – गुजरात हायवेवर सापुतारा घाटात एका खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. हा अपघात इतका जास्त भंयकर होता की, जागीच सात जणांचा मृत्यू झाला आहे. १५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेकजण जखमी असल्याचीही माहिती मिळतंय. ही बस २०० फूट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी पहाटेच्या सुमारास झालाय. हा अपघात इतका जास्त भीषण आहे की, अपघातानंतर बसचे दोन तुकडे झाले. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातच्या दिशेने ही बस निघाली होती. त्यादरम्यानच अपघात झालाय. मात्र, अजून अपघाताचे कारण हे कळू शकले नाहीये. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे. अपघातात मृत्यू झालेला सर्वजण मध्यप्रदेशचे असल्याची माहिती आहे. देवदर्शन करून जात असताना काळ त्यांच्यावर ओढवला.

घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची चाैकशी केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, हे लोक २३ डिसेंबरला प्रवासासाठी निघाले होते. उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणचे देवदर्शन करून ते अगोदर शिर्डीला पोहोचले. त्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वरचे दर्शन करून ते नाशिकहून गुजरातच्या दिशेने निघाले होते. एकून चार बस होत्या, त्यापैकी एका बसचा अपघात झालाय. अपघातानंतर आम्ही लोकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केले. दरीतून सर्वांना काढण्यात आलंय. बसमध्ये एकून ४० जण प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. जिल्हाधिकारी यांनीही या घटनेनंतर रूग्णालयात धाव घेतली. मात्र, अजून मृतांची नावे कळू शकली नाहीत. या घटनेने हळहळ व्यक्त केलीये जातंय. अपघाताची चाैकशी पोलिसांकडून सध्या सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon