डोंबिवलीत सत्यनारायण पूजेवरुन मराठी-अमराठी रहिवाशांमध्ये राडा, आपसात भिडले

Spread the love

डोंबिवलीत सत्यनारायण पूजेवरुन मराठी-अमराठी रहिवाशांमध्ये राडा, आपसात भिडले

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – सध्या ठाणे, कल्याण व डोंबिवली परिसरात भाषिक वादाच्या तसेच मराठी विरुद्ध अमराठी संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. मुंब्र्यामध्ये एका मराठी मुलाचा मराठी बोलण्यावरुन फळ विक्रेत्याबरोबर वाद झाला होता. महाराष्ट्रात राहतो, मराठीत बोलं असं हा मुलगा म्हणाला. त्यावरुन तिथल्या स्थानिक जमावाने मराठी मुलाला मारहाण केली होती. कल्याणमध्ये एका मराठी तरुणाला परप्रांतीय रिक्षा चालकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असून या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड करुन मनातील संताप बोलून दाखवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर कल्याणच्या शेजारी असलेल्या डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आला आहे. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभावरुन हा वाद झाला. पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला सोसायटीतील अमराठी लोकांनी विरोध केला. पूजा आणि हळदी कुंकू समारंभासंदर्भात अपशब्द वापरल्याचा आरोप होत आहे.

डोंबिवलीच्या या सोसायटीत पूजा आणि हळदी कुंकू समारंभावरुन शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. मराठी-अमराठी आपापसात भिडले असून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलं आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका मराठी तरुणाने रेल्वे स्टेशन परिसराची दुरावस्था मांडली होती. यावेळी परप्रांतीय रिक्षा चालकांनी त्याच्यावर हात उचलला होता. त्याआधी मागच्या महिन्यात डिसेंबरमध्येच कल्याणमध्येच एका उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, असे संतापजनक शब्द वापरले होते. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात मराठी-अमराठी वाद सातत्याने होत असून राज्यात भाजपप्रणित सरकार आल्यापासून परप्रांतीयांची दादागिरी वाढली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon