सिगारेट न दिल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; मानखुर्दमध्ये २८ वर्षीय फालुदा विक्रेत्याचा मृत्यू

Spread the love

सिगारेट न दिल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; मानखुर्दमध्ये २८ वर्षीय फालुदा विक्रेत्याचा मृत्यू

रवि निषाद / मुंबई

मुंबई : सिगारेट न दिल्याच्या किरकोळ कारणावरून २८ वर्षीय फालुदा विक्रेत्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून मानखुर्द पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहिद मशीबुल्ला शेख (वय २८) हे मंडाला येथील ३० फूट रोड परिसरात फालुदा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. १० मार्च रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे फालुदा विक्री करून ते घरी जात असताना ही घटना घडली. अल-मदीना हॉटेलजवळ ३० फूट रोड परिसरात आरोपीने त्यांच्या मागून येत धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वाहिद शेख यांना तातडीने उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणातील आरोपी सरफुद्दीन सहाबुद्दीन खान (वय २६) याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राथमिक तपासात, घटनेच्या एक दिवस आधी आरोपीने मृतकाकडे सिगारेटसाठी पैसे मागितले होते. मात्र वाहिद शेख यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon