जोगेश्वरी नंतर कांदिवली येथील एका शाळेस बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याने मोठी खळबळ; पोलीस यंत्रणा सतर्क
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – नुकताच एक अतिशय धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. मुंबईतील एका शाळेला बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवण्यात आलाय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली. मुंबईतील कांदिवली परिसरात ही शाळा आहे. धमकीच्या ईमेलची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने याची माहिती पोलिसांनी दिलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत असे धमकीचे मेल येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आरबीआयला देखील अशाप्रकारचा धमकीचा मेल आला होता. शाळा प्रशासनाने पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक शाळेत दाखल झाले. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना घरी पाठवण्यात आले. बॉम्बशोधक पथकानी तपास केले तसेच पोलिसांचे पथकही शाळेत दाखल झाले. दिल्लीमध्येही एकाच वेळी अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याचा धमकीचा ईमेल आला होता. यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी पाठवून दिले.
पोलिस देखील शाळांच्या बाहेर पोहोचले. आता थेट मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतीलच जोगेश्वरी येथील एका शाळेला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले होते. जोगेश्वरी येथील शाळेला बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल आला ही अफवाच असल्याचे नंतर स्पष्ट झाले. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करूनही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. विमान कंपन्यांनाही धमकीचे ईमेल काही दिवसांमध्ये सातत्याने येत होते. धमकींच्या ईमेलमुळे विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. आता शाळांना देखील धमकीचे ईमेल येताना दिसत आहेत. शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पालकांमध्ये घबराटीचे वातावरण बघायला मिळत आहे. आता धमकीच्या प्रकरणी पुढील तपास केला जात आहे.