वडिलांच्या व्यसनाचा त्रास, अल्पवयीन मुलाने बापाचा गळा दाबला; भयंकर घटनेने शहर हादरलं

Spread the love

वडिलांच्या व्यसनाचा त्रास, अल्पवयीन मुलाने बापाचा गळा दाबला; भयंकर घटनेने शहर हादरलं

योगेश पांडे/वार्ताहर 

नागपुर – वडिलांचे दारुचे व्यसन आणि दारु पिऊन शिवीगाळ करत असल्याच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलानेच जन्मदात्या पित्याची गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आई आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या दारूच्या व्यसनाला व त्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलाने गळा आवळून वडिलांची हत्या केल्याची भयंकर घटना नागपूरमध्ये घडली. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मुकेश शेंडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मुकेश शेंडे हे ताराचंद भोंगाडे यांच्या घरी पत्नी उर्मिला मुलासह भाड्याने राहत होते. मृतक मुकेश शेंडे हे एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते व त्यांना दारूचे व्यसन होते. त्यातूनच ते पत्नी तसेच मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यांच्या या वागणुकीला आई आणि मुलगा दोघेही कंटाळले होते. घटनेच्या दिवशीही मुकेश हे दारु पिऊन घरी आले होते. दारुच्या नशेत त्यांनी पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या वागण्याला अल्पवयीन मुलाने विरोध केला असता शेंडे संतापले. त्यांच्यात भांडण झाले व झटापट सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुलाने शेंडे यांना गादीवरून खाली ढकलले. खाली पडल्यामुळे अल्पवयीन मुलाने गळा आवळत शेंडे यांची हत्या केली. हा प्रकार पाहून शेंडे यांची पत्नी हादरली. दरम्यान, हत्येनंतर त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी पुरावा नष्ट करायला त्याची मदत केली.त्यांनी शेंडे यांचा मृतदेह पोत्यात भरला. तसेच घटनास्थळावरील रक्ताचे डाग पुसले. शेंडे यांचे चुलतभाऊ मंगेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon