दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – दिशा सामाजिक संस्था कामोठे आणि पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन शिविर सुषमा पाटील स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आले होते.
दिशा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नीलमताई आंधळे यांनी सांगितले की, कार्यक्रमामध्ये युवा वक्ते ऍडव्होकेट विवेक भोपी अणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक सौ. निलम आंधळे, सौ.विद्या मोहिते आणि दिगंबर होडगे हे उपस्थित होते. यात मंदार पनवेलकर व काटकर आणि इतर शिक्षक व टीम हजारो विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. मार्गदर्शकानी १०वी च्या विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले, विदयार्थ्यांनी देखील खूप छान प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती आंधळे यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.