महागड्या कार चोरणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून चार चार चाकी वाहनांच्या बनावट चाव्या असा जवळपास ६० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. अल्ताफ कासम अत्तार, जुबेर कयामुद्दिन कुरेशी, मुसाहिद अलिहास खान आणि जानिशार कमर आली अशी या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या चारही आरोपीकडून पोलिसांनी चार चाकी वाहन चोरीचे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. यात पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार चाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याचाही सहभाग असल्याची माहिती परिमंडळ २ चे पोलिस उप आयुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.