पंतनगर पोलिसांचा आयुक्तांकडून सत्कार, बेस्ट डिटेक्टशन अवॉर्ड मार्च २०२४ चे मानकरी
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – मुंबई पोलीस आयुक्त यांच्यातर्फे आयोजित होणारे बेस्ट डिटेक्शन अवॉर्डचे मानकरी घोषित झालेले असून त्यामध्ये घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांचा सत्कार पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पंतनगर पोलिसांच्या हद्दितील एका मुलीला तरुण फुस लाऊन तिला घेऊन मुंबईतुन फरार झाला होता.२०२४ मार्च महिन्यातील या प्रकरणाचा तपास पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष हमरे, महिला पोलिस कांस्टेबल सोनाली शिंदे आणि तांत्रिक तपासकर्मी परिमंडल ७ रूपाली हडवळे याना देण्यात आला होता. हमरे आणि त्यांच्या पथकाने या साठी उत्तर प्रदेशचे बाराबंकी, सीतापुर व इतर ठिकाणी शोध घेतला असता पीडित मुलगी पोलिसांना मिळून आली होती. पण आरोपी तिथून फरार झाला होता. त्यानंतर पुन्हा सुभाष रामचंद्र हमरे, पो.ह.सचीन गांजाळे, पो.अंमलदार योगेश नवले यांनी बाराबंकी व इतर ठिकाणी शोध घेत ट्रेनच्या पेंट्री कारमध्ये पाठलाग करुन त्या आरोपीला दिल्लीतुन ताब्यात घेऊन त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला मुंबईत आणण्यात आले होते. सदर उत्तम कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सब इंस्पेक्टर सुभाष हमरे, सोनाली शिंदे आणि तांत्रिक तपासकर्मी रूपाली हड़वले यानी केली होती. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक सर्वानी केली होते. या प्रकरणाची बातमी सर्वत्र प्रकाशित झाली होती म्हणून पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यानी त्या तपास पथकातील सर्वाना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला आहे. पंतनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश प्रभाकर केवले, पोलीस उपनिरीक्षक सुभाष हमरे ,पो.ह.सचिन गांजाळे,पो.अंमलदार योगेश नवले, सोनाली शिंदे आणि रूपाली हड़वले यांचा सत्कार करण्यात आला. या विशेष कामगिरीमुळे पंतनगर पोलिसांचे सर्वानी कौतुक केली आहे.