निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करुन मारहाण करणारे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्यावर खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. निवृत्त पोलिस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याह १० ते १२ जणांवर मुंबईतील वांद्रे येथे खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुर्नविकासात गेलेल्या घराचे भाडे न मिळाल्याने निवृत्त पोलिस उपनिराक्षक आणि १२ इतर व्यक्ती २६ डिसेंबर रोजी म्हाडा कार्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्या भेटीला गेले होते, यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
यावेळी संजीव जैस्वाल यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी आपल्याला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारदार निवृत्त पोलिस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी केला आहे.तसेच जैस्वाल यांनी मारहाण करत, मुंबई सीपी यांना सांगून एन्काऊटर करण्याची व पेन्शन बंद करण्याची धमकी दिल्याचाही चाळकेंचा आरोप आहे. तसेच जैस्वाल यांनी गळ्यातील चैन व हेडफोनही तोडल्याचा आरोप चाळके यांनी केला आहे. या प्रकरणी चाळके यांनी खेरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी म्हाडाचे उपाध्यक्ष जैस्वाल आणि इतर १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.