गुंतवणूकदारांना डबल रक्कमेचे आमिष; दोन कोटींहून अधिक घेऊन फरार, चौघांवर दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा

Spread the love

गुंतवणूकदारांना डबल रक्कमेचे आमिष; दोन कोटींहून अधिक घेऊन फरार, चौघांवर दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई –  राज्यात फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशीच एक घटना दहिसर परिसरात घडली आहे. ट्रेडिंग कंपन्यांच्या नावाने कार्यालय थाटून सर्वसामान्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. सुमारे शंभर गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतविलेली दोन कोटींपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक झाली आहे. गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे प्रलोभन दाखवून फसविणाऱ्या चौघांविरुद्ध दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनुसार, आयुर्वेदिक औषधांच्या कंपनीत काम करणाऱ्या भीमसिंग फिर्यादी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीतील एका व्यक्तीने लक्ष्मण चौहान याच्यासोबत ओळख करून दिली. गुंतवणुकीचे पर्याय शोधत असताना भीमसिंग यांनी चौहान याची त्याच्या दहिसर येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन ट्रेडिंग कंपन्या असून त्याआधारे आपण गुंतवणूक स्वीकारत असल्याचे चौहान याने सांगितले.

दरमहा, सहामाही, वार्षिक, मुदत ठेव, दैनंदिन ठेव अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजनांची चौहान याने माहिती दिली. चांगला परतावा मिळत असल्याने बँकेत पैसे ठेवण्याऐवजी या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय भीमसिंग यांनी घेतला. गुंतवणूक करण्यास सुरुवात करताच चौहान याने त्यांना एक लिंक पाठवून कंपनीचे मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. या अँपवर गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळालेला परतावा दिसत असल्याने भीमसिंग यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी ही कंपनी आणि गुंतवणुकीच्या योजनांबाबत नातेवाईक, मित्र मंडळी तसेच परिसरातील परिचयातील नागरिकांना माहिती दिली.

चांगला परतावा मिळत असल्याने अनेक जणांनी दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. बीटकॉइनची किंमत वाढणार आहे त्यामुळे आधीच गुंतवणूक करा असे चौहान आणि त्याचे सहकारी अमित भोसले, अमोल डोके, सुजित जाधव हे गुंतवणूकदारांना सांगू लागले. परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत अधिकाधिक पैसे गुंतवणूकदारांनी गुंतविले. काही महिने परतावा व्यवस्थित मिळाला मात्र नंतर रक्कम मिळणे बंद झाले. गुंतवलेली रक्कमही काढता येत नव्हती. आरोपींकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भीमसिंग यांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon