ठाण्यात ईडीची मोठी कारवाई; मंगळवारी कुख्यात डॉन दाऊदला धक्का देत इक्बाल कासकर याचा फ्लॅट ईडीने केला जप्त

Spread the love

ठाण्यात ईडीची मोठी कारवाई; मंगळवारी कुख्यात डॉन दाऊदला धक्का देत इक्बाल कासकर याचा फ्लॅट ईडीने केला जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

ठाणे – सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी ठाण्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाच्या फ्लॅटवर जप्ती आणली आहे. ईडीच्या कारवाईने दाऊद इब्राहिमचा भाऊ अडचणीत आला आहे. दाऊदच्या भावाने बिल्डरला धमकावत बनावट नावाने फ्लॅट घेतला होता. ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दाऊद इब्राहिम हा मुख्य आरोपी आहे. या घटनेच्या काही वर्ष आधीच मुंबई पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी दाऊदने भारतातून पलायन केले होते. त्यानंतर त्याचे भाऊदेखील फरार झाले होते. त्यातील काही हे अनेक वर्षानंतर भारतात परतले. त्यांच्यावर तपास यंत्रणांचा वॉच आहे.

ठाण्यात ईडीची मोठी कारवाई केली आहे.⁠अंडरवर्ल्ड डॅान दाऊद इब्राहिमच्या भावाचा फ्लॅटवर जप्ती आणली. दाऊदचा भाऊ ⁠इक्बाल कासकर याचा फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. ⁠कावेसर येथील नियोपोलिस टॉवर मधील फ्लॅटवरही जप्ती आणण्यात आली आहे. रियल स्टेटमध्ये दाऊदने गुंतवणूक करुन या फ्लॅटचा व्यवहार केला असल्याचे बोलले जात आहे. ईडीच्या तपासात इब्राहिम कासकर, त्याचे साथीदार, मुमताज शेख आणि इसरार सईदने दाऊद इब्राहिमशी जवळीक असल्याचे दाखवून रिअल इस्टेट डेव्हलपरकडून मालमत्ता आणि रोख रक्कम म्हणून खंडणी वसूल केली असल्याचे समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon