भाजपा युवामोर्चा कडून मुंबईत कांग्रेस मुख्यालयावर दगडफेक व तोडफोड; पोलिसांकडून लाठीचार्ज करत धरपकड

Spread the love

भाजपा युवामोर्चा कडून मुंबईत कांग्रेस मुख्यालयावर दगडफेक व तोडफोड; पोलिसांकडून लाठीचार्ज करत धरपकड

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला असून तोडफोड करण्यात आली. हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असताना त्यांनी जमावावर लाठीचार्ज केला. “आमचं कार्यालय वाचवण्याच्या प्रयत्नात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केला. भाजपाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज प्रेस क्लब येथील काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुरुवातील राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाहीफेक केली. त्यानंतर तेथील खुर्च्या फेकून देण्यात आल्या. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडेही मारली.

दरम्यान, भाजपाच्या या आक्रमकतेची पोलिसांना माहिती मिळताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयबाहेर तैनात करण्यात आला. या पोलिसांकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आलाअसून त्यांची धरपकड सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon