शाळेत वारंवार अपमानित करण्याच्या त्रासाला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या. आईला पाठवले व्हॉइस रेकॉर्डिंग

Spread the love

शाळेत वारंवार अपमानित करण्याच्या त्रासाला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या. आईला पाठवले व्हॉइस रेकॉर्डिंग

योगेश पांडे/वार्ताहर 

पालघर – आईला व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवत नववीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. शाळेमध्ये वारंवार अपमानित केलं जात असल्याने आत्महत्या करत असल्याचे या मुलाने म्हटले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पालकांनी शाळा प्रशानाविरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या बोईसर येथे एका शाळकरी विद्यार्थ्याने आपल्या आईला व्हाट्सअप वर व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत वारंवार अपमानित केले जात असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने रेकॉर्डिंगमध्ये म्हटलंय. टोकाचे पाऊल उचलणारा विद्यार्थी बोईसरमधील टीन्स वर्ल्ड कॉर्पोरेट स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या शिकत होता.

विद्यार्थी आणि शिक्षकांकडून आपल्या मुलाची छळ होत असल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललं असून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मृत मुलाच्या पालकांकडून करण्यात आले आहे. या घटनेनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपासानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे बोईसर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon