दारुच्या नशेत बस चालक आणि क्लीनर शाळेच्या मुलांना घेऊन निघाले पिकनिकला; सहार वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

Spread the love

दारुच्या नशेत बस चालक आणि क्लीनर शाळेच्या मुलांना घेऊन निघाले पिकनिकला; सहार वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – मुंबईत गेल्या आठवड्यात कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये ९ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. या अपघाताला काही दिवस उलटले असताना आता पुन्हा एक भयावह प्रकार समोर आला आहे. अंधेरीमधील खाजगी बस चालक आणि क्लीनर दारूचे नशेत शाळेच्या मुलांना घेऊन पिकनिकला निघाल्याचं समोर आलं आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेमधील खाजगी बस चालकाने हा कारनामा केला आहे. दारूच्या नशेत बस अंधेरी कुर्ला रोडवर नागमोडी चालवत असताना वाहतूक पोलिसांनी बस थांबवली. साहार वाहतूक पोलिसांनी बस थांबवल्यानंतर बस चालक आणि क्लीनर दोघे दारूचे नशेत असल्याचं समोर आले. पोलिसांनी वेळेवर बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील खाजगी बस चालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साकीनाका योगीराज श्रीकृष्ण विद्यालयमधून शाळेच्या मुलांना घेऊन ही खासगी बस गोराईमध्ये पिकनिकसाठी मंगळवारी सकाळी ९. ३०वाजता निघाली होती. या बसमध्ये योगीराज शाळेचे ४० ते ५० मुलं होते. दारूच्या नशेत बस अंधेरी कुर्ला रोडवर नागमोडी चालवत असताना वाहतूक पोलिसांनी बस थांबवली. यानंतर पोलिसांनी बस चालकाची तपासणी केली. यानंतर साहार वाहतूक पोलिसांनी बस थांबवल्यानंतर बस चालक आणि क्लीनर दोघे दारूचे नशेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वेळेवर बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या सर्व प्रकारानंतर वाहतूक पोलिसांनी बस ताब्यात घेतल्यानंतर शाळेचे मुख्यध्यापक आणि पालकांना बोलावलं.बस चालक आणि बस क्लीनरवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon