ऐरोलीच्या यादव नगर परिसरात ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत प्रवाहामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात
नवी मुंबई – येथील यादव नगर परिसरात २२००० व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर उघडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याठिकाणी अनेक बॉम्बस्फोट सदृश स्फोट होत आहेत, परंतु याकडे लक्ष न देता महावितरण शांत बसले आहे. महावितरणचे कोणतेही सरकारी कर्मचारी लक्ष देत नाहीत, ही सर्व व्यवस्था व देखरेख खाजगी कर्मचारी करीत आहेत. नुकतेच एमआयडीसी राज प्रेम सैनी नावाच्या मुलाला ट्रान्सफॉर्मरच्या विद्युतप्रवाजवळ संपर्क आल्याने शॉक लागला होता. यामध्ये सदर मुलगा भाजला असून निष्पाप लोकांचे बळी जाण्याची वाट महावितरणचे अधिकारी पहात आहेत का अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील भारतीय जनता पार्टी अध्यक्ष प्रभाग क्रमांक ६ चे महेश पांडे यांनी दिली आहे.