धक्कादायक ! पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्यास अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – राज्यात दिवसेंदिवस मुली व महिलांवर अत्याचार होत असताना पुण्यात देखील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत.अशी ह एक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करुन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. किशोर राहुल सवने (वय २४, रा़ घोरपडी गाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी तसेच आरोपीच्या घरी घोरपडी गाव येथे फेब्रुवारी २०२४ पासून आतापर्यंत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना प्रेमाजालात फसवून त्यांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढून शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ४ ते ५ वेळा त्यांच्या राहते घरी व आरोपीच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुंढवा पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा ) दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे तपास करीत आहेत.