तरुणीकडून थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सांस्कृतिक पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी झपाट्याने वाढत चालली आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. बलात्काराचा गु्न्हा दाखल करण्याची धमकी देऊन एकाकडून चार लाख ६४ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. नयना सतीश कुंटे (रा. लाइफ निर्वाणा सिटी, धानोरी) असे गु्न्हा दाखल केेलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंटे आणि तक्रारदार तरुणाची जानेवारी महिन्यात ओळख झाली. तरुण धानोरी भागात राहायला आहे. दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर कुंटेने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. बलात्काराचा गुन्हा दाखल करते. तुला गुन्ह्यात अडकवते, अशी धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी चार लाख ६४ हजार रुपये उकळले. तरुण, तसेच त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. कुंटेच्या त्रासामुळे तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुडगे तपास करत आहेत.