हॉटेलच्या वेटरला क्षुल्लक कारणावरुन मारहाण, मालकाने मित्राचीच केली हत्या
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – हॉटेलच्या वेटरला बोलल्याचा शुल्लक कारणावरून हॉटेल मालकाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं आहे. प्रसाद उर्फ किरण पवार असं हत्या करण्यात करण्यात आलेल्या ग्राहकाचे नाव आहे. तर या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी हॉटेल मालक अक्षय येवले याला ताब्यात घेतलं आहे. हत्या केलेल्या प्रसाद आणि त्याचा मित्र अभिषेक यांचा हॉटेलमधील वेटरसोबत वाद झाला होता.
पोलिसांनी जी माहिती दिलीय त्यानुसार तळेगाव दाभाडे येथील इंदोरी गावाजवळ असलेल्या हॉटेल जय मल्हारमधील वेटरला मयत प्रसाद पवार आणि अभिषेक येवले या दोघांनी वाद घालत मारहाण केली होती. त्यानंतर त्याने झालेला सर्व प्रकार हॉटेल मालकाला सांगितला. त्यानंतर हॉटेल मालकाने त्या दोघांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. दरम्यान ते दोघेही कोयता घेऊन पुन्हा हॉटेलवर आले. यावेळी हॉटेल बंद करत असताना हॉटेल मालक अक्षय आणि मयत प्रसाद व त्याचा मित्र अभिषेक याचे पुन्हा वाद घातला. दरम्यान हॉटेल मालकाने त्याच्या हातातील कोयता घेत दोघांवर रात्रीच्या सुमारास वार केले. या घटनेत प्रसाद पवार याचा मृत्यू झालाय तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.