बेलापूरच्या जंगलामध्ये २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; सोमवार पासून होता बेपत्ता. पारसिक टेकड्यांजवळ लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
योगेश पांडे/वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई बेलापूरच्या पारसिक हिल जंगलामध्ये २४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन स्वत:चा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी नवी मुंबईतील दारावेगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह पारसिक हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. पादचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह खाली काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास सीबीडी पोलीस ठाण्यात एका २४ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आदेश योगेश अंबिरे असं या तरुणाचं नाव आहे. सोमवारी पहाटे १.३० च्या सुमारास पारसिक टेकड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याला शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्याच्या एका हातावर गौतम बुद्धांचा टॅटू कोरलेला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी पारसिक हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. या मृतदेहाच्या शरीरावर गौतम बुद्धांचा टॅटू कोरलेला होता. सोमवारी सीबीडी पोलिसात बेपत्ता व्यक्तीची तक्रारही दाखल करण्यात आली होती आणि मंगळवारी सकाळी मृतदेह सापडला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आदेश योगेश अंबिरे असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या हातावर एक टॅटू होता. नवी मुंबई स्थानिक पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.