बनावट कागदपत्रांच्या आधारे ज्ञान संपदा शाळेमध्ये नोकरी करणाऱ्यावर कारवाईची मागणी
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – बनावट दस्तावेजाच्या आधारे ज्ञान संपदा शाळा, शिवाजी नगर गोवंडी येथील शाळेमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून लिंगा भगवान हातेकर हे त्या शाळेत कर्मचारी आहेत. हातेकर यांच्या सर्व कागदपत्राची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी राम हातेकर यानी केली आहे. राम हातेकर यांच्या म्हणन्यानुसार शिवाजी नगरमध्ये त्यांचे घर, ३ रिक्शा आणि त्याचे परमिट आहे. या बाबत मागणी केल्यामुळे आणि फर्जी दस्तावेजा आधारे कामाला लागल्यामुळे त्यानी राम हातेकर याना जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. या बाबत राम हातेकर यानी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्त आणि गावाचे सर्व संबंधित अधिकारी यांना तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना लेखी तक्रार दिली आहे. तरी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. मिळालेल्या माहितीनुसार, लिंगा भगवान हातेकरनी शाळेमध्ये नोकरी साठी सर्व कागदपत्रे बनावट देऊन नोकरी घेतली आहे. याची चौकशी झालयाने निष्पन झाले होते. त्याची प्रत पण शिवाजी नगर पोलिसानी राम हातेकर याना दिलेली आहे. म्हणून त्यांची मागणी आहे की सदर व्यक्तीस तात्काळ नोकरी वरुन निलंबित करुन शासन प्रशासनला दिशाभूल करणाऱ्या या लिंगा हातेकर याला अटक करण्यात यावी.