पुण्यात हिट अँड रन! दिवाळीचे फटाके उडवत असतानाच भरधाव कारने उडवलं, तरुण जागीच ठार

Spread the love

पुण्यात हिट अँड रन! दिवाळीचे फटाके उडवत असतानाच भरधाव कारने उडवलं, तरुण जागीच ठार

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – पुण्यात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवत असतानाच भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने एका ३५ वर्षाच्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक अद्याप फरार असून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे नागरिक संतप्त आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक केली नाही तर, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे. रावेत मधील सेलेस्टियल सिटी सोसायटी समोर सोहम पटेल हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करत होता. कुटुंबासह फटाके उडवत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने त्याला उडवलं. यावेळी तिथे अनेक लोक उपस्थित होते. कार इतक्या वेगात होती की काही सेकंद कोणाला काय झालं हे कळलंच नाही. अपघातानंतर कारचालक तिथे अजिबात थांबला नाही आणि पळ काढला.

ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी पटेल कुटुंबीयवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात होऊन जवळपास ४८ तास उलटल्यानंतरही आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे रावेत परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक केली नाही तर, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon