पुण्यातील चाकणमध्ये बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
चाकण -पुण्यातील चाकण परिसरात बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-३ ने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ७७० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भोसे गावात करण्यात आली. अर्जुन बिरबल राठोड (वय ३८, रा. भोसे, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसे गावात एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ७७० लिटर गावठी हातभट्टी दारू, ५८ गुळाच्या ढेपा असा एकूण ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.