वाहनचोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरास अटक
रवि निषाद/प्रतिनिधि
ठाणे – नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी व घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता नौपाडा पोलिस स्टेशन तपास पथकाचे स पो नि मंगेश भांगे व सहकारी असे पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार देसाई यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक इसम नौपाडा हद्दीत वाहन चोरीच्या उद्देशाने फिरत आहे. बातमीच्या अनुषंगाने सापळा रचून शिताफीने नानू रमेश पठाडे, वय २६ वर्ष, रा म्हात्रे चाळ, कोपरखैरणे,नवी मुंबई यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या खिशामध्ये ५ ते ६ विविध दुचाकी चाव्या मिळून आल्या. तो सदर ठिकाणी वाहन चोरीच्या उद्देशाने आल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे कडे तपास केला असता त्याने नौपाडा परिसरात घरफोडी, वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून तपासादरम्यान त्यांच्याकडून २ बजाज २२० पल्सर , १ पॅशन प्रो गाडी, १ बजाज प्लॅटिना गाडी अशी ४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदर अटक आरोपीकडून ४ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त आषुतोश डुंबरे, सह पोलीस आयुक्त डाॅ.ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पष्चिम प्रा.विभाग विनायक देषमुख, पोलीस उप आयुक्त,परि.१ सुभाष बुरसे, सहा.पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोनि(गुन्हे) शरद कुंभार,पोनि सुनिल तांबे (प्रशासन) यांचे मार्गदर्षनाखाली तपास अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक ,पोउनि मकानदार,पोहवा गायकवाड, पोहवा पाटील, पोहवा देसाई, पोहवा रांजणे, पोहवा गोलवड, पोहवा तडवी, पोना माळी, पो. शि. कांगणे व पो. शि. तिर्थकर यांनी केली आहे.