अभिलेखावरील सराईत आरोपी अंमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – आर.सी.एफ.पोलीस ठाणे अभिलेखवरील अंमलीपदार्थाची तस्करी करणारा इसम नामे मोहम्मद इकलाख बशीर शेख उर्फ मोहम्मद इकलाख मोहम्मद इस्राईल शेख उर्फ मुसा उर्फ सलमान उर्फ अकलाख (३४) याच्या विरुद्ध मुंबई शहरात अंमलीपदार्थ तस्करीचे ७ गुन्हे दाखल होते.त्याचावर पीआयटीएनडीपीएस कायदा १९८८ अन्वये स्थानबद्ध कारवाई होण्याकरिता आर.सी.एफ. पोलीस ठाण्याकडून पोलीस आयुक्त मुंबई शहर यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलीस आयुक्त यांच्या मार्फत सदरचा प्रस्ताव स्क्रिनिंग कमिटी ला सादर करण्यात आला. सदर प्रस्तावास स्क्रिनिंग कमिटी ने मान्यता दिल्याने सदरचा प्रस्ताव प्रधान सचिव,गृह विभाग, महाराष्ट्र शासन,मुंबई यांच्याकडे अंतिम मंजुरी करीता पाठवण्यात आला होता.दि.१५/१०/२०२४ रोजी स्थानबद्ध अधिकारी तथा प्रधान सचिव (अपील व सुरक्षा),गृह विभाग,महाराष्ट्र शासन,मुंबई यांनी नमूद इसमा विरुद्ध पीआयटीएनडीपीएस कायदा १९८८ अन्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केल्याने सदर इसमास स्थानबद्ध करून दि.१६/१०/२०२४ रोजी ताब्यात घेऊन, स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली.
मिळाली माहितीनुसार, ड्रग्ज माफिया विरुद्ध अशी कारवाई होऊ शकते हे कित्येक पोलिसांना माहितच नाही. या कायद्याची प्रक्रिया खूप जटील आहे आणि अशी केस पोलीस स्टेशन स्तरावर करणे जवळपास अशक्य आहे.परंतु , पोलीस आयुक्त मुंबई शहर विवेक फणसाळकर,पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-६, मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.सी.एफ.पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीएफ पोलीस ठाण्याचे प्रतिबंधक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी अफाट श्रम घेऊन ही कारवाई तडीस नेली आहे. सदर कारवाई हा एक इशारा आहे,जो ड्रग्ज माफियांना पोलिसांनी दिला आहे.जर त्यांनी आपले अवैध धंदे सोडले नाहीत तर त्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई केली जाईल.