मुंबईतील बोगस कॉल सेंटर पोलिसांकडून उद्ध्वस्त; शेकडो गुंतवणूकदारांना गंडा, १४ आरोपी गजाआड

Spread the love

मुंबईतील बोगस कॉल सेंटर पोलिसांकडून उद्ध्वस्त; शेकडो गुंतवणूकदारांना गंडा, १४ आरोपी गजाआड

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई –  राज्यात सध्या ऑनलाईन फसवणूक, सायबर चोरट्यांकडून नागरिकांच्या आर्थिक पुंजीवर डल्ला मारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशीच एक घटना मालाड परिसरात घडली आहे. मालाड येथे बेकायदा कॉल सेंटर चालवून गुंतवणुकीच्या नावाखाली देशातील असंख्य नागरिकांना फसविणारी टोळी मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने उद्ध्वस्त केली. पोलिसांनी याप्रकरणी १४ जणांना अटक करून त्यांच्याकडून २ लॅपटॉप, १६ डेस्कटॉप,२ मोबाइल तसेच इतर साहित्य हस्तगत केले आहे. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून, त्यांना शेअर्स करन्सी गुंतवणुकीस भाग पाडले जात होते. या टोळीने सुमारे शेकडो नागरिकांना फसविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मालाड येथील कॉन्टिक इन्फोटेक कंपनी, ऑफिस नंबर १०७, पहिला मजला, क्वॉटम टॉवर, चिंचोली बंदर रोड, मालाड परवाने न घेता अनधिकृत कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ८ चे पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे यांना मिळाली.कॉलसेंटर मध्ये ऑनलाईन मॅच ट्रेडर ॲप्लीकेशनद्वारे लोकांची वैयक्तिक माहिती प्राप्त करून, त्यानंतर त्यांना ऑनलाईन अप्लीकेशनद्वारे कॉल करून, युनाडेट किंगडम (इंग्लड) या देशातून व्हिएफएक्स मार्केट्स या ब्रोकींग फर्म कंपनीतून बोलत असल्याचे सांगत असत. फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास खात्रीशीर व जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुतंवणूकदारांना ट्रेडींग करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून लाखो रूपये बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करून घेत होते. ट्रेडिंग करीता पुरविण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर आरोपी स्वतःच गुंतवणूकदारास प्रथम फायदा झाल्याचे भासवत असत. त्यानंतर पुन्हा गुंतवणूकदाराकडून आणखी पैसे उकाळून त्यांचे ट्रेडिंग ॲपमध्ये नुकसान झाल्याचे भासवून गुंतवणूकदारांचे लाखो रूपये आरोपी स्वतःचे फायदयाकरीता वापरत असल्याची खात्रीशीर माहिती कक्ष ८ ला मिळालेली होती. पोलिसांनी या छापे मारीत एकूण १४ आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात मालाड पोलीस ठाण्यात कलम ३१६(२),३१६(५),३१९(२),३१८(४) भारतीय न्याय संहिता कलम २५(क) भारतीय तार‌ अधिनियम सह कलम ६६(क),६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम ३ सह महाराष्ट्र ठेवी निधानाच्या वित्तीय संस्थेत घेता संबंधाचे संरक्षण अधिनियमन १९९९ आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई), विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई), देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डीपश्चिम), प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, पोलीस हवालदार चव्हाण, किणी, काकडे, कुरकुटे, कांबळे, पोलीस शिपाई सटाले, बिडवे, साळवे, पोलीस शिपाई होळंबे व महिला पोलीस शिपाई भिताडे यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon