पवई पोलिसांकडून चोरी व गहाळ झालेले २०३ मोबाईल मूळ मालकांना परत
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – पवई पोलिसानी चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले २०३ मोबाइल फोन हस्तगत करून ते त्या मोबाइल पीडिताना परत केले. त्यामुळे त्या सर्व पीड़ितानी पवई पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिस मोबाइल मिसिंग स्टॉफ ने जानवरी २०२४ पासून अता पर्यन्त चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले २०३ मोबाइल फोन मुंबई महाराष्ट्र किंवा इतर राज्यातुन चोरी किंवा गहाळ झालेला वापरात असलेला व्यक्तींना ट्रेस करुन हस्तगत केले होते. हे मोबाइल विविध तांत्रिक तपास यंत्रणेद्वारे हस्तगत केले. यामध्ये एकूण ४० लोकांना पोलिसांनी विविध कलमाचे वापर करुन अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, अपर पोलिस आयुक्त परमजीत सिंह दहिया,पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त सूर्यकांत बांगर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीतेन्द्र सोनावणे यांचा मार्ग दर्शनाखाली मोबाइल मिसिंग स्टॉफचे पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ज्या लोकांचे मोबाइल हस्तगत करुन त्यांना परत केले त्या सर्व लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.