प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न, प्रियकराची आत्महत्या; चिंचवड येथील लॉजवर वेगळंच घडलं, पोलीस तपास सुरू

Spread the love

प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न, प्रियकराची आत्महत्या; चिंचवड येथील लॉजवर वेगळंच घडलं, पोलीस तपास सुरू

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – पिंपरी- चिंचवड मध्ये प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.दुपारी साडेचार च्या सुमारास पिंपरीतील खराळवाडीत असलेल्या हॉटेल राज प्लाझा या ठिकाणी घटना घडली. नितेश नरेश मिनेकर वय (३४) असं आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. तर, २८ वर्षीय तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास दोघे लॉज राज प्लाझा येथे आले, त्यांनी त्या ठिकाणी रूम बुक केली होती. अवघ्या काही मिनिटातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. हे ऐकून हॉटेल व्यवस्थापकाने ११२ नंबर वर फोन करून पोलिसांना बोलून घेतलं. पोलीस हॉटेलमध्ये आले, त्यांनी त्या दोघांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतून नितेशने कपडे घालत आहे. दरवाजा उघडतो, असं उत्तर दिलं. परंतु, त्यानंतर बराच वेळ झालं दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा, २८ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात तर नितेश ने गळफास घेतल्याचं उजेडात आलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हत्या आणि आत्महत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनेत तरुणी गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीवर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon