पिंपरी- चिंचवड येथील डी. वाय. पाटील शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांना अल्पोपहारातून विषबाधा
योगेश पांडे/वार्ताहर
पिंपरी- चिंचवड – पिंपरी- चिंचवड मध्ये शाहू नगर येथील डी.वाय.पाटील शाळेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच समोर आल आहे. या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्या सारख झाल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पिंपरी- चिंचवड मध्ये शाहू नगर येथील डी.वाय.पाटील शाळेतील साडेतीनशे मुलांना ब्रेड आणि चटणी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळेत गुरुवारी अल्पोपहार ठेवण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी हा मेनू देण्यात आला. अल्पोपहार घेतल्यानंतर काही मिनिटातच विद्यार्थ्यांना उलटी मळमळल्यासारखं व्हायला लागलं, काही विद्यार्थ्यांना भोवळ आली. तातडीने काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. इतर विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आलं. यावेळी शाळेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊ घालणाऱ्यावर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
शाळेचे संचालक अभय खोतकर यांनी सांगितले की शाळेत गुरुवारी अल्पोपहार ठेवला होता. ब्रेड आणि चटणी मेनू होता. ३०० ते ३५० मुलांना विषबाधा झाली आहे. गंभीर घटना झालेली आहे. सर्व पालकांची माफी मागतो. हॉस्पिटलमध्ये मध्ये मुलांना घेऊन जाण्यात आलं आहे. जे काही खाण्याच साहित्य आणलं आहे. त्याची टेस्ट करणार आहोत. १ ली ते ४ थी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना खायला दिलं आहे. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली शाळा आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.